Tuesday, December 18, 2007

तिमिर सागर तिरी हेलकावे जिवन नाव

तिमिर सागर तिरी हेलकावे जिवन नाव,
किना-यालगत जरी उभी पैलतिरी वसले गाव

सोसाट वारा ओढ लावे शिडाला,
झुले तो अंगांगांशी, लपटे तनुला
लोभ पैलतिराचा मनी हाच भाव
तिमिर सागर तिरी हेलकावे जिवन नाव,

त्या तिरी नाखवा ज्याशी जन्माचे मिलन
अखेर नियतीची साथ मिळली तुटले बंधन,
काळ्या रातीत निघाली अन भरकटली नाव
तिमिर सागर तिरी हेलकावे जिवन नाव,

चहुओर जलप्रवाह ना दिशा सापडे,
लहरींच्या सन्निध्यात अजुन अंधार दाटे
हरवली विचारगर्तेत ना कळे ठाव
तिमिर सागर तिरी हेलकावे जिवन नाव,

व्हावे का असे... सारे अनोळखी भासे,
कालप्रवाहात नष्ट झाले त्या गावाचे ठसे..
पुन्हा निघाली प्रवासा शोधण्या नवे गाव
तिमिर सागर तिरी हेलकावे जिवन नाव,

--sneha

Wednesday, December 12, 2007

ग़ूड बाय लेटर

ग़ूड बाय लेटर

एक छोटंसं पत्र
रेखीव हृदयाचे
माझ्या मनीचे
ग़ूड बाय लेटर

अनपेक्षित तू निघाला
माझ्या हृदयावर घाला
अपरात्री अश्रु गळाला
फ़क्त तुझ्याचसाठी

सवय जडली तुझी
तुझ्या असण्याची
आणि नसलास तरी
आठवणींतून भासण्याची

फ़ार नाही अपेक्षा
तुझ्या साथी पेक्षा
तु समोर तरी मी अबोल
माझ्यासाठी मोठी शिक्षा

मग मनी ठरवलं
लिहायचे गुड बाय लेटर
व्यक्त करायचे मन
उलगडायचे सारे पदर

मोठ्या हिमतीने मग
उचलली लेखणी
थरथरत्या हातांनी
उतरली माझी कहाणी

मग ऐक ....

तु येता येता आणली
ती सोनचाफ़्याची पहाट
आयुष्याला मिळाली
एक अनपेक्षित वाट

वाटेवरी मार्गस्थ
पाउल थकले
वळुन तुज पाहिले
पायरव माझेच एकले

नि मी जाणिले
वाटा तिथेच दुभंगल्या
मागिल वळणावर जिथे
जुळल्यागत भासल्या

पाहिले तुला स्वप्नात
हात हाती अन..
आयुष्याच्या शपथा
घेताना..

स्वप्न मोडले..
पाहिले एकटे स्वत:ला..
हात रिते तरी..
तुझा स्पर्श शोधताना...

खर सांग....


नाही का तू पाहिलेस कधी
माझ्या डोळ्यात क्षणभर
दिसले असते हृदय दिवाणे
कोरलेले नाव अंतरंगावर

बघ मिटवता येत असेल
तर पुसुन टाक ना ते नाव
नाही तर एक घाव दोन तुकडे
कर ..कर माझ्या हृदयावर घाव

तुझ्याविण जगणं
खरच का हे जगणं
का यंत्रवत शरिरासवे
फ़क्त जिवंत असणं

तुझ्या द्रुष्टीने नसेन मी
अगदी जिवाभावाची
माझ्यासाठी तुझी साथ
आहे जन्मोजन्मीची

हा जन्म नसे आपला,
पुढच्या जन्मी भेटशिल का रे?
हि आपुली अधुरी कहाणी
पुर्ण करण्याचे वचन देशिल का रे?

--स्नेहा

Friday, December 7, 2007

निजेला म्हणावं घेउन ये नवी स्वप्ने...

निजेला म्हणावं घेउन ये नवी स्वप्ने...
मनाला साद घालणारी..
अमर्याद वेग असणारी..
क्षणीक अस्तित्व तरळणारी..
काजळकाळ्या रात्रीला
चंद्रप्रकाश देणारी.........

रमेन त्या स्वप्नांत ...
हरवेन स्वत्व .. स्वप्नवत नगरी..
जिच्या दाराशी स्वप्नफ़ुलांचा वृक्ष ....
हलवला ना की ओंजळभर सडा पडतो...
सुगंधी सडा ...
हळूच एक फ़ुल घेउन केसात माळेन...
... कोण ते?
दाराशी कुणाची तरी चाहुल....
त्या एवल्याशा फ़टीतुन कोणीतरी डोकावते आहे...
एवलासा गोंडस बाळ ... बोलके डोळे...
हृद्याला भुल पडणारे स्मित..
एवढा ओळखीचा चेहरा...
ओह ..कशी विसरले मी तुला?..
माझे जिवन.... निरागस...
थांब जरा .... ही स्वप्नफ़ुले तुझ्याचसाठी ..
ये जिवना..तुला कवटाळायचं आहे मला बाहुपाशात....
या स्वप्ननगरीच्या बाहेर तुला घेउन जायचे आहे मला...
असेच निरागस....

--स्नेहा

Thursday, November 15, 2007

स्वप्नफ़ुले part II

स्वप्नफ़ुलान्च्या बागेत एक नवे स्वप्न फ़ुलले,
इवल्याश्या डोळ्यान्नी किलकिले पाहिले,
पाहुन स्वप्ननगरीस ते खुदकन हसले,
तुझे बोट पकडुन दुनियेत अवतरले...ज़प त्याला....

--स्नेहा

काळोखाच्या राज्यात चमके तो चान्द तारा,
रातराणीच्या गंधात धुन्द झाला गार वारा,
रात्रीच्या अंगणात स्वप्नफ़ुले फ़ुलवू जरा,
सुर्यकिरणान्च्या साथीने चढेल त्यास रंग न्यारा

--स्नेहा

आज स्वप्नपरी सवे दिसली एक गोड परी,
तेजोमय कान्ती अन नेत्रदिपक मुकुट शिरी,
तिचे एक स्मित उजळे लक्ष दिप धरेवरी,
स्वप्नफ़ुलान्ची लाडकी म्हणती तिज दिपावली

--स्नेहा

मी कोण ?

मी कोण ?

प्रत्येकाला हा प्रश्न कधी ना कधी पडतोच..
आज मला पण पडला..

मी तो सुर्य, तो चंद्र की ती पणती...

सुर्य म्हणजे स्वयंप्रकाशीत, स्वयंभु.....
ह्याच्या प्रकाशात सगळे उजळते..
हा झाकोळुन टाकतॊ सगळ्यांना..
ह्याच्याकडे उघड डोळ्यांनी पाहणे पण मुश्किल असते... नाही का?..
ना कोणी जवळ जाउ शकत...
त्याला सगळे नमन करतात ..पण त्याचा सखा होणे कोणासही शक्य नाही
त्याची संगत म्हणजे त्या झळा आणि एक झाकोळुन टाकणारे व्यक्तीमत्व..

मग कोण मी ?...तो चंद्र का...
तो शशी नेहमी सुर्याच्या प्रकाशावर अवलंबून
जरी वाटला शितल, शांत तरी...स्वयंप्रकाशासाठी परावलंबी...
हा देखील असे दूर गगनी ... त्या ता-यांना बिलगुनी...

का मी ती पणती...?
फ़क्त एकच ठिणगी..त्या पणतीला प्रज्वलित करायला पुरेशी..
त्या पणतीमधिल तेल म्हणजे ती धग..जी संपेपर्यंत पणती जगत असते..
जेव्हा मी जन्मले तेव्हाच ती पहिली ठिणगी मिळाली मला...
तेव्हा पासुन जळत आहे.....
आता ती धग संपेल तेव्हाच विझेन..
पण त्या दरम्यान खुप गोष्टी घडतील...
तो जोराचा वारा येउन विझवायचा यत्न करेल...
करु दे त्याला प्रयत्न .. हार मानणा-यातली मी नव्हे...
जरी लहान पणती ..तरी स्वयंप्रकाशित आहे..
उरी माझ्या प्रचंड तेज.. मी स्वावलंबी आहे...
अंधार दुर करण्याची शक्ती मी पण बाळगते..

मग मी नक्की ती पणती, ते तेल, ती वात , की ती ज्योत ...?
हम्म....कोणी ही नाही... मी फ़क्त तो प्रकाश
ती पणती, ते तेल, ती वात ,ती ज्योत ही फ़क्त जगाला अस्तित्व दाखवायची साधनं..
जसे हे शरीर ..नाही का ..?
मी त्या शरीरात वसणारी उर्जा .... त्या पणतीचा प्रकाश..
एक जोरदार वारा विझवेल ही कधी.... किंवा ते तेल संपेल..
मग मी नष्ट .....
जगातील प्रत्येक गोष्ट नष्ट होणारी आहे.....
मग का नष्ट होऊ नये थोडा उजेड देउन..

हो नक्किच मी ती पणती....

--स्नेहा

नयी दोस्ती

नयी दोस्ती नयी बातें,
मुलाकातों की हसीं यादें,
तकदीर अच्छी जो मिले हम,
ना मिलते तो एक कमी रहती जैसे,

आपसा हसीं लाजवाब,
आपकी हंसी बेमिसाल,
उसपे आपका कोमल मन है कमाल,

रहना हमेशा ऐसे ही मासूम ,
होना कभी ना गुमसुम

--स्नेहा

दसरा

माधुर्याचे क्षण देउन जावो,
आनंदाचे उधाण घेउन येवो,
यशाशी सख्य असेच राहो,
सुखसम्रुद्धी जिवनात पेरुन जावो !
असा हा हसरा, आला सण दसरा..

--स्नेहा