ग़ूड बाय लेटर
एक छोटंसं पत्र
रेखीव हृदयाचे
माझ्या मनीचे
ग़ूड बाय लेटर
अनपेक्षित तू निघाला
माझ्या हृदयावर घाला
अपरात्री अश्रु गळाला
फ़क्त तुझ्याचसाठी
सवय जडली तुझी
तुझ्या असण्याची
आणि नसलास तरी
आठवणींतून भासण्याची
फ़ार नाही अपेक्षा
तुझ्या साथी पेक्षा
तु समोर तरी मी अबोल
माझ्यासाठी मोठी शिक्षा
मग मनी ठरवलं
लिहायचे गुड बाय लेटर
व्यक्त करायचे मन
उलगडायचे सारे पदर
मोठ्या हिमतीने मग
उचलली लेखणी
थरथरत्या हातांनी
उतरली माझी कहाणी
मग ऐक ....
तु येता येता आणली
ती सोनचाफ़्याची पहाट
आयुष्याला मिळाली
एक अनपेक्षित वाट
वाटेवरी मार्गस्थ
पाउल थकले
वळुन तुज पाहिले
पायरव माझेच एकले
नि मी जाणिले
वाटा तिथेच दुभंगल्या
मागिल वळणावर जिथे
जुळल्यागत भासल्या
पाहिले तुला स्वप्नात
हात हाती अन..
आयुष्याच्या शपथा
घेताना..
स्वप्न मोडले..
पाहिले एकटे स्वत:ला..
हात रिते तरी..
तुझा स्पर्श शोधताना...
खर सांग....
नाही का तू पाहिलेस कधी
माझ्या डोळ्यात क्षणभर
दिसले असते हृदय दिवाणे
कोरलेले नाव अंतरंगावर
बघ मिटवता येत असेल
तर पुसुन टाक ना ते नाव
नाही तर एक घाव दोन तुकडे
कर ..कर माझ्या हृदयावर घाव
तुझ्याविण जगणं
खरच का हे जगणं
का यंत्रवत शरिरासवे
फ़क्त जिवंत असणं
तुझ्या द्रुष्टीने नसेन मी
अगदी जिवाभावाची
माझ्यासाठी तुझी साथ
आहे जन्मोजन्मीची
हा जन्म नसे आपला,
पुढच्या जन्मी भेटशिल का रे?
हि आपुली अधुरी कहाणी
पुर्ण करण्याचे वचन देशिल का रे?
--स्नेहा
No comments:
Post a Comment