वाढदिवस....
पुन्हा एक वर्ष सरले...
हिशोबाअंती हाती काय उरले...
पुन्हा भेटती तिच ती जुनी ठिकाणे,
नव्याने पुन्हा तिच दिसती दुकाने
जणू चक्र फ़िरुनी तिथेच परतले,
जणू एक आवर्त पुर्ण करोनी झाले....
जन्म लाभला मला इथे याच दिवशी,
भुतलावर घेतला श्वास याच दिवशी..
मग सुरु झाले माझ्या जगण्याचे धडे सुरु,
गिरवले किती पाढे आणि आयुष्याची उजळणी सुरु..
अड्खळुन पडले तरी उठायला शिकले,
रक्तबंबाळ जखम लपवुन हसायला शिकले,
नव्हत्याचे होते करायला शिकले,
जिवघेण्या स्पर्धेत टिकायला शिकले...
नि मिळवली अगणित नाती...
काही नाजुक सुगंधी फ़ुलासारखी,
काही बोचणारी निवडुंगासारखी,
काही वरुन रुक्ष पण गाभा गोड फ़णसासारखी,
काही आंबट गोड मोसंब्यासारखी...
काही नाव असलेली काही निनावी,
काही अशी की लाख मोलाची ठरावी.....
--स्नेहा
1 comment:
छानच !
Post a Comment