Tuesday, December 18, 2007

तिमिर सागर तिरी हेलकावे जिवन नाव

तिमिर सागर तिरी हेलकावे जिवन नाव,
किना-यालगत जरी उभी पैलतिरी वसले गाव

सोसाट वारा ओढ लावे शिडाला,
झुले तो अंगांगांशी, लपटे तनुला
लोभ पैलतिराचा मनी हाच भाव
तिमिर सागर तिरी हेलकावे जिवन नाव,

त्या तिरी नाखवा ज्याशी जन्माचे मिलन
अखेर नियतीची साथ मिळली तुटले बंधन,
काळ्या रातीत निघाली अन भरकटली नाव
तिमिर सागर तिरी हेलकावे जिवन नाव,

चहुओर जलप्रवाह ना दिशा सापडे,
लहरींच्या सन्निध्यात अजुन अंधार दाटे
हरवली विचारगर्तेत ना कळे ठाव
तिमिर सागर तिरी हेलकावे जिवन नाव,

व्हावे का असे... सारे अनोळखी भासे,
कालप्रवाहात नष्ट झाले त्या गावाचे ठसे..
पुन्हा निघाली प्रवासा शोधण्या नवे गाव
तिमिर सागर तिरी हेलकावे जिवन नाव,

--sneha

No comments: