बीज अंकुरे अंकुरे,
मोल मायेचे फ़िटले,
बळ पंखांचे वाढले,
किमया आईची
देह चंदनापरि झिजला,
गुण त्याचाच उतरला,
लेप सोनियाचा ल्याला,
किमया आईची
जशी जळते ग वात,
देई अंधारास मात,
लख्ख जिवनी प्रभात,
किमया आईची
अश्रु दाटती नयनी,
ऐकुन माझी कहाणी,
दु:ख मागे ईश्वरचरणी,
वेडी माया आईची
उगा वेडी म्हणु नका,
माय माझी माझा सखा,
देव प्रत्यक्ष भेटला,
भक्त मी आईची
माय माझी वैशाखनिवारा,
माय माझी निस्वार्थी झरा,
फ़ैलावे चैतन्य पिसारा,
राहावे त्या खाली
सात जन्म ही ना फ़िटती,
ऋण ममतेचे किमती,
नाही बाजारी मिळती,
सावली आईची
स्पर्श मायेचा उबदार,
नयनी प्रेमाचा पाझर,
मिठी म्हणजे जिवनसार,
महानता आईची
--स्नेहा
No comments:
Post a Comment