Friday, August 24, 2007

आयुष्य तेच आहे

आयुष्य तेच आहे,
क्षणा क्षणाचा खेळ आहे,
प्रत्येक दिवसागणिक
सुख दुखचा मेळ आहे

...स्नेहा

आयुष्य तेच आहे,
दिवसा मागे रात्र आहे,
कधी डोळ्यात हासु,
तर कधी तिथे आसु आहे
...स्नेहा

माझ्या मनी खोल वसतेस तु

वार्यालाही कळत नाही,
का तो असा छळतो ?
तुझ्या चेहर्यावरची बट,
तो का बरे दुर करतो ?
दिसत नाही त्याला,
किती सुंदर दिसतेस तु,
त्या लटीच्या आडुन बघणारी,
माझ्या मनी खोल वसतेस तु.

...स्नेहा

तु निमित्त आहे म्हणुनच

तु निमित्त आहे म्हणुनच
माझ्या अस्तित्वाला अर्थ आहे,
जसे सावलीची साथ सतत असते,
तसे तुझे माझे आहे

...स्नेहा

निमित्तमात्र का असेना
तु माझ्या साथीला असतोस,
वास्तव वाटावे इतके
माझ्या स्वप्नात वसतोस,
जगते आठवणीतला प्रत्येक क्षण,
जेव्हा तो पाऊस कोसळतो

...स्नेहा

तु निमित्त आहे म्हणुनच
एक कोडं नेहमी पडते,
मी तुझी आठवण काढली,
या ढगाला कसे कळते,
बरसतं आभाळ जलधारा घेऊन,
माझ्या वरचं रडुन घेते,
कधी वीजेचा कडकडाटही होतो,
आणि जीवाची राख होते.

..स्नेहा

तु निमित्त आहे म्हणुनच
शोधते मी माझ्यात तुला पुन्हा पुन्हा,
आणि मग जाणवते मला कि,
मनात माझ्या तुझ्याच तर पाऊलखुणा.

..स्नेहा

तु निमीत्त आहेस म्हणुनच
त्या सुर्याच्या झळा कमी भासतात,
का तुझ्या सौंदर्यापुढे,
त्यालाचीही किरणे फिकी पडतात.

..स्नेहा

काही क्षण.... मैत्रीसाठी....

वार्यावर उडत एक पान आले माझ्याकडे
म्हणाले," क़शी आहेस? खुप लांबुन आलोय मी"
मी म्हणाले,"मग दमला असशील खुप"
"बस जरा तुझा पाहुणचार करते मी"

पान म्हणाले," अगं पाहुणचार कसला करतेस?
जायचे आहे मला त्या वार्याबरोबर"
मी म्हनाले " अरे किती फिरत रहणार तु?
सैरभैर, का भटकतोस वार्याबरोबर "

पान खळखळात हसले आणि सांगु लागले

"जेव्हा होतो मी झाडावर
फिदा होतो माझ्या तरुणाईवर
झुलत रहायचो फांदीवर
हसायचो मी वार्यावर

हिरवागर्द होतो मी
आनंद व्हायचा पाहुन
त्या फांदीशी सख्य होते माझे
जी मला ठेवायची पकडुन

कधी विचारच नाही केला मी
कधी सुकुनही जाईन मी
या जोरदार वार्याच्या गर्तेत
कधी उन्मळुन पडेन मी

त्या फांदीची साथ सुटेल
मग मी सैरभैर होईन
परत न भेटण्याचे दुख घेऊन
या वार्यासोबत फिरेन

ऊतारवय झालेय माझे
आता न दिशांची चिंता
एके दिवशी विझणारच आहे
माझ्या आयुश्याची चिता

फक्त दुख एवढेच आहे
त्या फांदीची आठवण काढतोय
धन्यवाद द्यायचे राहुन गेले
फक्त तेवढ्यासाठीच फिरतोय"

मी म्हणाले,
"आयुष्यात नेहमी असेच का होते?
जीवाभावाच्या व्यक्तीचे आभार मानणेच राहुन जाते

मी ही उन्मळुन पडेन..कधी? ते.. सांगता नाही येणार
जिवन संपुन जाईल पण धन्यवाद मानायचे राहुन जाणार

गेलेला क्षण परत कधीही येत नाही
परत संधी मिळेल की नाही सांगता येत नाही

म्हणुनच धन्यवाद तुम्हा सर्वांना
माझ्या जीवाभावाच्या मित्र मैत्रिणिंना"

-स्नेहा

Wednesday, July 25, 2007

शेरो शायरी

जीने का बहाना ढुंढने जिंदगी गुजार रहे थे,
जब तुम चले गये, ये जाना के बहाना चला गया,
ाब जी रहे है के आपका दिदार हो जाये,
के तुम्हारा इंतजार ही जिनेका बहाना बन गया

--स्नेहा

जंजिरोंसे जखडे है मेरे हाथ ,
कैसे रोकु तुम्हे ए दिल,
चाहु भी तो पुकार ना पाऊं,
होंठ गये है मेरे सील

--स्नेहा

हजार नहिं एक लम्हा तो खुशिका,
हमारे साथ गुजार होगा,
जो याद करोगे तुम वो लम्हा,
तो जीवन सफल हमारा होगा

--स्नेहा

मौत भी ना मांगे हम रबसे,
यहि चाहत है अभी,
एक नजर तो देख पायेंगे आपको,
मौत के बाद वोह भी नही

--स्नेहा

जो सिनेमे धडकता है मेरे,
वोह दिल तो कब का तुम्हारा है,
हम तो हिफजत कर रहे है,
बस इंतजार तुम्हारा है

--स्नेहा

ना जाने क्युं एक दर्दसा होता है दिलमे,
जैसे की कोइ आग का दर्या है,
हम फिर रो लेते है आंसु बहाके,
के शायद ये आग बुझ जाये

--स्नेहा

यही तो मज़ा है ,ज़िंदगी खेल खेलती है
ढूँढा जहाँ में , आख़िर पैरों तलेही मिलती है.

..स्नेहा

Friday, July 20, 2007

सावळी मी

सावळे हे रुप माझे
सावळीच काया
सावलीही माझी
सावळीच आहे

सजवते आहे
सावळ्या तनुला
सावळ्या या गालावर
आज रक्तिमा आहे

सावळेच नभ सारे
जलधारा बरसता
त्सावळ्याच संध्याकाळी
सोबतीला असतात

सावळेच आहेत
द्रुष्टीतील दोन सखे
सावळ्या त्या सख्यांमुळे
दुनियेत रंग आहे

जगाच्या या सर्व छटा
सावळ्याच भासतात
भिजुन आज मी गेले
सावळ्या या रंगात

रंगावर जाऊ नका
मन निरंकार आहे
जरी सावळी मी
मन शुध्द माझे आहे

असे हे सावळे रुप माझे
सावळीच काया
सावलीही आज माझी
सावळीच आहे

हे मुंबईकर

ही मी निघाले माझ्या रस्त्यावर
रोजचीच वाट, रोजचेच धावणे
रोजचीच गर्दी, रोजचेच पाहुणे
माझ्यामागे त्यांचे रोजचेच धावणे

मुंबापुरी माझ्याबरोबर झोपते उठते
माझ्यासोबतच दिवस जगते
माझ्या प्रत्येक फेरीबरोबर
त्यांचे जीवन वेग धरते

झुकझुक माझ्या श्वासाबरोबर
त्यांचे जीवन ताल धरते
कधी संगीत तर कधी विसंगत
सुरावटीत ते ऐकु येते

प्रत्येक प्रवासी हितगुज करतो
सुखदुखांची रास उधळतो
माझ्यासोबत मनास मने
जुळवण्याचे तो प्रयत्न करतो

मी नेहमीच धावते
उनपावसाची कशास तमा
हेच मझे सांगणे तुम्हासी
जीवनगाणे गात रहा

(सगळे व्यवस्थित चालले होते...
पण नजर लागली कोणाची...?
तारीखः ११ जुलै २००५)

ते नरधम माझ्या जीवावर उठले
चढले ते शस्त्रास्त्रांनी स्फोटक सोडुन गेले
मोठ्या धमाक्याने तेव्हा माझे अंग चिरटले
आणि माझ्या साथिदारांच्या जिवाचे कत्तल केले

एक धमाका एक स्फोट
किती जिवांची कत्तल
तो आक्रोश ती धावपळ
जगण्याची ती धडपड

ती शरीराची लक्तरे,
ते लटकलेले हात,
ते रक्ताचे थारोळे,
निर्दयांनी केला घात

ती पिळवटलेली नजर,
विचारते 'मीच का?'
पाहणार्याच्या नजरेलाही
असह्य होतो धक्का

पहा पहा त्या बाळाचा आक्रोश
निर्जीव आईच्या कुशीत
सहज गेला नसेल जीव तिचा
त्याच्या भविष्याच्या विचारत

मग दिसतात सरसावलेले
तत्पर मदतीचे हात
घायाळांना दिलासा देणारे
ते देवाचे अवतार

वर्षे उलटली काळही सरला
मागे व्रणही ठेवुन गेला
निर्दयतेच्या क्रुर प्रसंगी
जीवनात घाव सोडुन गेला

खचले तेव्हा मी ,म्हणाले आता माझे कोणी नाही
मझ्याबरोबर राहुन जीव गमावेल कोणी

परंतु..

माझे नमन तुझ्या चरणी
हे मुंबईकर,
तुझ्या धाडसाला माझा सलाम,
ठेंगा दाखवुन दहशतवाद्यांना,
तु सुरु केलेस आपले काम