Friday, August 24, 2007

काही क्षण.... मैत्रीसाठी....

वार्यावर उडत एक पान आले माझ्याकडे
म्हणाले," क़शी आहेस? खुप लांबुन आलोय मी"
मी म्हणाले,"मग दमला असशील खुप"
"बस जरा तुझा पाहुणचार करते मी"

पान म्हणाले," अगं पाहुणचार कसला करतेस?
जायचे आहे मला त्या वार्याबरोबर"
मी म्हनाले " अरे किती फिरत रहणार तु?
सैरभैर, का भटकतोस वार्याबरोबर "

पान खळखळात हसले आणि सांगु लागले

"जेव्हा होतो मी झाडावर
फिदा होतो माझ्या तरुणाईवर
झुलत रहायचो फांदीवर
हसायचो मी वार्यावर

हिरवागर्द होतो मी
आनंद व्हायचा पाहुन
त्या फांदीशी सख्य होते माझे
जी मला ठेवायची पकडुन

कधी विचारच नाही केला मी
कधी सुकुनही जाईन मी
या जोरदार वार्याच्या गर्तेत
कधी उन्मळुन पडेन मी

त्या फांदीची साथ सुटेल
मग मी सैरभैर होईन
परत न भेटण्याचे दुख घेऊन
या वार्यासोबत फिरेन

ऊतारवय झालेय माझे
आता न दिशांची चिंता
एके दिवशी विझणारच आहे
माझ्या आयुश्याची चिता

फक्त दुख एवढेच आहे
त्या फांदीची आठवण काढतोय
धन्यवाद द्यायचे राहुन गेले
फक्त तेवढ्यासाठीच फिरतोय"

मी म्हणाले,
"आयुष्यात नेहमी असेच का होते?
जीवाभावाच्या व्यक्तीचे आभार मानणेच राहुन जाते

मी ही उन्मळुन पडेन..कधी? ते.. सांगता नाही येणार
जिवन संपुन जाईल पण धन्यवाद मानायचे राहुन जाणार

गेलेला क्षण परत कधीही येत नाही
परत संधी मिळेल की नाही सांगता येत नाही

म्हणुनच धन्यवाद तुम्हा सर्वांना
माझ्या जीवाभावाच्या मित्र मैत्रिणिंना"

-स्नेहा

No comments: