Tuesday, January 22, 2008

मी आणि तो

जिवन चक्रात सापडलेली मी,
जसा कोळ्याच्या जाळ्यात सापडलेला तो...

पुढे जाण्याच्या प्रयत्नात मागे खेचली जाणारी मी...
जसा सुटण्याच्या धडपडीत नकळत अजुन गुंतणारा तो.....

क्षणिक लालसा जशी जिवनाच ताबा घेते ना...
तसा मोहाच्या जाळ्यात अडकलेला तो.........

--स्नेहा

आंखें

लाख छुपाना चाहूं पर आंखें करें बयान,
जुबान कुछ और कहे और आंखें बेइमान.......

तू भी बडा चालाक कितनी शरारत करता है,
जुबान पे हाथ रखके आंखों से ही बात करता है.

मिले आंखें हमारी दो जिस्म एक जान हो जाते है,
तेरी आंखों में डुब के सौ जन्म जी जाते है.

होने दो बात आंखों से जुबान की क्या जरुरत,
मेरी आंखों ने दे दी तेरी आंखों को इजाज़त

जो अल्फाज़ नही कहते वोह कहती है आंखें,
तेरी मेरी आंखें गाती है सुनहरे कल की सौगतें....

---स्नेहा

नये साल की बहोत बहोत शुभकामनाएँ

नये साल की नयी परिभाषा
हरदम साथ रहे ये आशा
हार जीत तो होती रहेगी
ना हो कम अपनी अभिलाशा

नये साल के सुंदर सपने
आँखोंमे है समाए जीतने
छूना चाहे नयी उँचाई
पूरे हो ये भी अभिलाशा

आप्तज़नों का साथ मिले
खुशीके हमेशा फूल खिले
महकता रहे ये जीवन
ना हो कभी निराशा

-- स्नेहा

मी असले नसले

मी असले नसले,
नाही कोणाला दिसले,
काय फ़रक पडतो?

मी हसले रुसले,
डोळ्यात अश्रु दिसले,
कोण कुठे पुसतो?

मी तुटले फ़ुटले,
वाटेत अडखळले,
साथ कोणी नसतो.

मी जळले विझले,
कापरापरि द्रवले,
कोण मला साठवतो?

मी थरथरले शहारले,
हिमनगासम थंडावले,
कोण शाल पांघरतो?

मी गायले गुणगुणले,
सुरात सामावले,
कोण रसिक ऐकतो?

मी नादमय झंकारले,
पैंजण निखळले,
कोण गोळा करतो?

--स्नेहा

Thursday, January 3, 2008

थंडीची लाट

थंडीच्या लाटेने झोडपले फार..
कुडकुडलो कूरकूरलो पडलो थंडगार..

थंडावले श्वास अन सून्न जग सारं...
बधीर करी इंद्रीयांना अस्सं गार वारं...

गोठलेलं शरीर.... साकोळलेलं रक्त...
केला देवाचा धावा जमले सारे भक्त...

म्हणती..

ऊबेची भीक दे.... कृपेचे वरदान दे...
गोठल्या या जिवाला तुझ्या समईचा प्राण दे...

देव उत्तरला....

माझी अनमोल निर्मिती मानवजात..
इतरांहून अलग माणुसकी त्याच्यात..

मान्य मी गोठवले रक्त, पण मन का गोठवले तुम्ही..
भावनांचा -हास केलात, अन माणूसकी सडवलीत तुम्ही..

समजा मी घेत आहे या सगळ्याच सुड..
हा माझ्या बेबंद रागाचा आसुड..

प्रलयाला तयार राहा भोगा कर्माची फळे..
ऊबेसाठी प्रज्वलीत करा माणूसकीचे दिवे.....

--स्नेहा

Saturday, December 22, 2007

भ्रमर

भ्रमर

नाजुक कळीगत मी,
अन तू भ्रमर दिवाणा
गुंजन करी कानाशी,
गायी तू नवा तराणा

ते धुंद मधुरसे गाणे,
जिवास वेड लाविते,
डोलुन तुझ्या तालावर
हलकेच उमलुनी जाते

नादवेडी तुझी सख्या,
तू भ्रमर असे अलबेला,
ना तुझा ठावठीकाणा,
राहशिल कसा सोबतीला ?

--स्नेहा

रांगोळी

रांगोळी

रंगित दिसे हे जग जरी,
रंगांधळे रहिवासी दिसले,
न दिसले गुण रंग कुणा,
उधळुन रांगोळी गेले

सजली होती रांगोळी,
दाराशी नाजुक साजुक,
एक वादळ फ़िरुनी आले
पायदळी तुडवले गेले,

--स्नेहा