थंडीच्या लाटेने झोडपले फार..
कुडकुडलो कूरकूरलो पडलो थंडगार..
थंडावले श्वास अन सून्न जग सारं...
बधीर करी इंद्रीयांना अस्सं गार वारं...
गोठलेलं शरीर.... साकोळलेलं रक्त...
केला देवाचा धावा जमले सारे भक्त...
म्हणती..
ऊबेची भीक दे.... कृपेचे वरदान दे...
गोठल्या या जिवाला तुझ्या समईचा प्राण दे...
देव उत्तरला....
माझी अनमोल निर्मिती मानवजात..
इतरांहून अलग माणुसकी त्याच्यात..
मान्य मी गोठवले रक्त, पण मन का गोठवले तुम्ही..
भावनांचा -हास केलात, अन माणूसकी सडवलीत तुम्ही..
समजा मी घेत आहे या सगळ्याच सुड..
हा माझ्या बेबंद रागाचा आसुड..
प्रलयाला तयार राहा भोगा कर्माची फळे..
ऊबेसाठी प्रज्वलीत करा माणूसकीचे दिवे.....
--स्नेहा
1 comment:
अगदी वेगळीच अन् सुंदर कल्पना.
Post a Comment