Saturday, January 26, 2008

उन्हं

शिवार फुललं जवारीच्या कनसानं
जनाईबाई माझी घालिते पानी त्याला
कामाला लागली ती गेली शेतामंदी
रो रो आवाज ईमानागत येऊ लागिला..

पहावं ते नवलच बाई असं कसं झालं..
फ़ना काडुन हुबा समोर भूजंग
थरारली जनाबाई शब्द फुटंना तोंडी
पळत शेताबाहेर आली कळंना रागरंग..

उरी धड्धड घेऊन पोरा बाळांस संग
चाली घराकडे पटापट टाकत पाय...
केलं थोडं कोरड्यास उन उन भरवलं
पोरांच्या पोटाला आधाराला दुसरं काय?.

तोच..

समोर भुजंग उभा ठाकला..दादला जनीचा..
भरला पोटाचा खळगा ओढुन घास बाळांचा.
जनीला कळेना खेळ हा दैवाचा..
कारावा -हास कोणत्या भुजंगाचा

एका भुजंगाने घेतला जमीनीचा ताबा
आणि दुस-याने घेतला जिवनाचा ताबा..

--स्नेहा

No comments: