बाहुल्या या मोठ्या जुलमी,
कधी मवाळ तर कधी हुकमी,
त्यांचा पाहून घ्यावा नेम,
नाजूक हृदयाला करती जखमी
--स्नेहा
बाहुळ्यांनी बोलावले
खेळायला लपाछूपी,
घेतले मला नयनात ,
आणि मिटली बंद कुपी
--स्नेहा
बाहुल्या या खट्याळ तुझ्या,
कधी वेंधळ्या कधी मिस्कील,
जीव रमतो बाहुल्यांमधेच
सोडून जाणे होते मुश्कील
--स्नेहा
बाहुल्या मोठ्या गुणाच्या
त्यांना सारे सारे कळते,
सुखात हसू ओघळते,
तर दु:खात पाणी कोसळते
--स्नेहा
एकदा बाहुल्या माझ्या रूसल्या,
रडवेल्या त्या मला म्हणाल्या,
इतके सारे रंग तरी
आम्ही का सावळ्या,
खुळ्याच त्या
त्यांना हे समजेना,
रंग त्यांचीच देण आहे ,
जरी त्या सावळ्या...
--स्नेहा
बाहुल्यांची असते गूढ भाषा,
नकळत संवाद एकमेकांशी,
अनाहूत जुळतात नाती ,
जणू ओळख गतजन्मीची
--स्नेहा
2 comments:
छान लिहिले आहे.
AV
http://mianimazatv.blogspot.com/
स्नेहा , छान आहेत कविता तुझ्या । बाहुल्यांशी जवळीक छान साधली आहे .
Post a Comment