ती शिक्षित तुजपरी,
ती कमवी तुजपरी,
तिची स्वप्ने , तिच्या आशा,
जश्या तुझ्या , तिच्याही तशा,
डोळ्यांत विश्व सामावले कारण..
ती ही एक माणुस तुजपरी,
जिथे न स्त्रित्वास थारा,
चुल मुल ना तिचा सहारा,
ज्ञानाची घेऊन पाऊले,
स्पर्धेत उतरे ती तुजपरी
जन्मदात्यांची ग छाया
भावंडांची ग माया
जशी तुला ओढ त्यांची
तशीच ती त्यांच्यासाठी बावरी
धिराची ती सोडीले घरदार
सोडीले आप्तजनांचे आधार
कवटाळीले तुझे घर
मानिले आपुले तुझे विचार
पण , कशासाठी...
या अपेक्षांसाठी..
सकाळची न्याहारी, रात्रीचे जेवण,
थकली जरी ती करते तरी पण,
एक नोकर, एक स्वयंपाकीण, न तक्रारीस थारा,
एक आई, एक अर्धांगिनी, जरी मनाविरुद्ध संसार सारा
ना हट्टी ती , जाणते तुज न आवडे
बुद्धीमत्ता अगाध, तरी त्याचे तुला वावडे
जिवापाड प्रयत्नांच्या बळकट धाग्याने
या बंधनाचे सोने करायचय
फ़क्त तुझ्या साथीची अपेक्षा
जिवन तुझ्या बरोबरच जगायचय
हवा आहे तुझा आधार , तुझी संवेदना,
थोडक्यात तुझे प्रेम ... देशील ना?
---- एक अनुवाद .... डायरेक्ट फ़्रोम हार्ट ( स्नेहा )
No comments:
Post a Comment