तुझ्या जिवनातील स्त्री
ती अशी मुलगी , जी तुझ्याएवढीच शिकलेली;
तुझ्याएवढेच ती ही कमवते;
ती.. जिची स्वप्ने आणि आशा तुझ्यासारख्याच आहेत.... कारण ती ही एक माणुस आहे तुझ्यासारखीच;
ती,अगदी तुझ्या किंवा तुझ्या बहीणीप्रमाणे जीने अजुन स्वयंपाक घरात पाय नाही ठेवला ... कारण ती ही व्यस्त होती अभ्यासात आणि कामात जिथे तिच्या किचनच्या गोष्टींना महत्व नाही ;
ती, जी तिच्या आई वडीलांवर आणि भावंडांवर तेवढेच प्रेम करते जेवढे गेले २०-२५ वर्षे तू करत आहेस;
ती, जीने तिचे घर, तिची प्रेमाची माणसे, हे सर्व सोडले, , कारण... फ़क्त तुझ्याखातर, तुझ्या घराखातर, तुझ्या पद्धती आणि शेवटी तुझे नाव ही स्विकारण्यासाठी
परंतु,
ती.... तिला पहिल्या दिवसापासुन एक सुगरण मानलं गेलं, ती नव्या वातावरणाशी, परिस्थितीशी आणि स्वयंपाकघराशी अनोळखी आणि तेव्हा तू निवांत झोपलास तिला पेचात टाकुन;
ती, जिने सकाळी उठुन पहिला चहा करावा आणि दिवसाच्या शेवटी जेवण बनवावे, मग ती तुझ्यापेक्षा जास्त का थकलेली असेना, आणि तिने कधीही तक्रार करायची नाही,,,,,
तिला नाही आवडले तरीही एक नोकर, एक स्वयंपाकीण , एक आई, एक अर्धांगिनी ही रुपे निभावायची,
ती ही शिकते आहे की तुला काय हवे आहे ; काही वेळेस गबाळी आणि बेडौलही वाटत असेल ती;
तीला माहीत आहे जास्त अपेक्षा तुला चालणार नाहीत आणि तुझ्या पुढे गेलेलाही
तीचा ही मित्रवर्ग आहे, ज्यात काही पुरुषही असतील, तिचे शाळेतील, कॊलेजमधील किंवा ऒफ़िसमधील मित्रांना विसरली फ़क्त तुझा मत्सर टाळण्यासाठी , स्पर्धा आणि असुरक्षिततेपासुन तुला दुर ठेवण्यासाठी;
हो, तिही तुझ्यासारखीच नाचु गाऊ शकते पण टाळते फ़क्त तुला नाही आवडणार म्हणुन;
ती, जीला तुझ्यासरख्याच डेडलाईन्स सांभाळाव्या लागतात, मग कधी ती उशीराही परत येऊ शकते;
ती, जी ह्या महत्वाच्या नात्याला जपते आणि त्यासाठी जिवापाड कष्ट करते, आणि त्यासाठी फ़क्त तुझ्या विश्वासाची आणि मदतीची अपेक्षा करते;
ती, जी तुझ्या घरात फ़क्त तुला ओळखते, आणि फ़क्त अपेक्षिते... तुझा आधार, तुझी संवेदना, तुझा समजुतदारपणा, आणि थोडक्यात ...
फ़क्त तुझे प्रेम.....
पण बरेच पुरुष हे समजु शकत नाहीत.....
No comments:
Post a Comment