पडली होती अडगळीत, धूळ खात...
माझ्या आयुष्याची डायरी...
मळकट रंग पुसटसा
आणि गंध कुबटसा....
पाने अगदी जिर्ण....
बर्याच दिवसात काही लिहिले गेलच नाही जणू...
आणि त्या पानांवर गडद शाईत लिहिलेले...
माझे आयुष्य..
पहिल्या पानावर माझी ओळख...... NOBODY
आणि त्या नंतरच्या प्रत्येक पानावर ती ढोबळ अक्षरे...
कधी वाकुल्या दाखवत, कधी हसत, कधी रडत, कधी विव्हळत....
माझ्यासोबत गिरवलेली प्रिय जणांची काही अक्षरे......
तर काही पानांवर .. कोण मी?.... हाच हुंकार..
थांबा.. बर्याच पानांवर ते दुसर्याचे हस्ताक्षर....
त्यानंतरची सर्व पाने ..... मजकूर तोच तोच..
जणू काळ तिथेच थांबला...
माझ्या आयुष्यात नवीन काहीही न लिहिता..
आणि शेवटी काही कोरी पाने....
जणू माझ्या लेखणीची वाट पाहत आहेत...
नव्याने सुरू करणार मी लिहायला..
माझ्या आयुष्याची डायरी...
पण यावेळेस माझ्या पद्धतीने.......
--- स्नेहा
No comments:
Post a Comment