तुझ्या आठवणींचा कप्पा,
तुझ्या माझ्या गोड गप्पा,
तो सुना पडलेला कट्टा,
तू माझी केलेली थट्टा
बंद केले मनाच्या कपाटात,
चावी फेकली दूर समुद्रात
तू परत येऊन का वर्मावर घाव घालतोस ?
तुला कसे कळत नाही तू मला किती छळतोस,
कुठून आणलिस त्या कापटाची चावी,
तुला ते उघडायची परवानगी मी का द्यावी?
..स्नेहा
1 comment:
बंद केले मनाच्या कपाटात,
चावी फेकली दूर समुद्रात
तू परत येऊन का वर्मावर घाव घालतोस,
कुठून आणलिस त्या कापटाची चावी,
तुला ते उघडायची परवानगी मी का द्यावी?
किती खरंय्. पण ह्या चाव्या अशाच " घेतल्या " जातात, न विचारता ! परवानगी द्यायचा प्रश्न येतच नाही ! मर्जी " त्यांची " च चालते, दोन्ही वेळी !!
सुरेख कविता !
Post a Comment