मैत्री असावी...
साखरेसारखी शुभ्र, मधूर, गोडवा देणारी,
जिवनात विरघळणारी आणि अशी की जिवनाहून वेगळी न वाटणारी,
जिवन प्राशन केल्यावरही जिभेवर चव रेंगाळणारी,
प्रत्येक क्षणाचा आस्वाद वाढवणारी,
आनंदाच्या क्षणी तोंड गोड करणारी,
जराही उष्णता लागली तरी लगेच करपणारी
--स्नेहा
1 comment:
स्नेहा तू म्हणतेस मी कवी नाही पण असे काही लिहले गेले आहे तुझ्याकडून त्यावरून तरी असे वाटते की तू नक्की मोठी कवियत्री म्हणून नावारुपास येशील खुपच छान कविता लिहली आहेस तू
Post a Comment