Saturday, June 30, 2007

एक कळीचे मनोगत


गुलाबांच्या ताटव्यात गुलाब होते खुप
लाल, पिवळे, गुलाबी,पांढरे रंगही होते खुप
कुणी घेतो फुललेला गुलाब तर कुणी घेतो कळी
तर कुणी टवटवीत गुलाब विकत घेई

का नेहमी पाहीले जाते बाह्यरुप
सुगंधाची परिक्षा करण्यात काय आहे चुक

अशीच मी एका गुलाबच्या ताटव्यात आहे
सुन्दर नसेन पण गंध माझा वेगळा आहे

माझ्या माळ्या,

पण तुही असाच का रे इतरांसारखा
द्रुष्टीला पडणारे सत्य मानणारा
माझ्या जीवनात तुला आहे अनन्य महत्व
तुच नाही का माझ्या सुगंधाचे रहस्य

मी एक खुरटे रोप होते
मोठ्या झाडांची भिती वाटायची
मग अजुनच खुरटी व्हायचे मी
त्यांच्या सावलीत दबुन जायचे मी

एके दिवशी तु आलास
माझ्या जीवनाला तु आकार दिलास
खतपाणी दिलेस मुळांस माझ्या
बळकट केलेस तनमनास माझ्या

आणि मग कळालेच नाही
या रोपाचे गुलाब झाले कधी
कळी अर्धवट फुलली
तशी फुलपाखरे आली
तु शिकवलेस त्यांना तोंड द्यायला
सांगीतलेस संकटांचा मुकाबला करायला

मग मी तुला आपलंसं टाकलं करुन
तु करशील तेच बरोबर अगदी डोळे झाकुन

नुकतीच उमललेली कळी
नाजुक असते खुळी
खुप असते हळ्वी
खुप असते भोळी

तुला फक्त एकच सांगणे आहे माझ्या माळ्या
तुझ्या सहवासात फुलल्या असतील खुप कळ्या
ह्या कळीला मात्र तुझीच आस आहे
नसेल सुंदर पण तिचा गंध मात्र वेगळा आहे

1 comment:

शशांक नवलकर said...

ही कळी खूप चांगली उमललेली आहे .
ह्या कळीचा सुगंधही खूप मोहक आहे .


अर्थात सांगायचे झाले तर तुझी कविता खूप छान आहे.मला आवडली .