Wednesday, June 13, 2007

सुखासीन मी उधळीत रंग निघाले

सुखासीन मी उधळीत रंग निघाले
सुर्याच्या या तेजाला घेउन संग निघाले
वाटेवर माझ्या पसरीत फुले निघाले
तोडुन पाश सारे मुक्त होउन मी निघाले

संगीताच्या तालावर नाचेन आज मी
मदहोश होउन लहरीत गुंग होइन मी
नका थांबवु मला वेगात मी निघाले
तोडुन पाश सारे मुक्त होउन मी निघाले

मुक्त फुलांवर फुलपाखरु आज मी
डोलायला फुलांना आज लावणार मी
वार्याशी आज स्पर्धा करण्यास मी निघाले
तोडुन पाश सारे मुक्त होउन मी निघाले

राहणार आहे स्वप्नांच्या जगात मी
पाहणार आहे उद्याचे स्वप्न मी
डोळ्यात विश्व सारे सामावण्या निघाले
तोडुन पाश सारे मुक्त होउनी निघाले

नयनांत आज माझ्या चित्र ज्याचे आहे
स्वप्नांत सार्या त्याचेच राज्य आहे
शोधण्यास तो स्वप्नवीर आज एकटी निघाले
तोडुन पाश सारे मुक्त होउनी निघाले

ब्रम्हांडाच्या कोड्याला देईन आज छेद
मनात माझ्या वसते जगकिर्तीची उमेद
काळविवरापलिकडे जाण्यास मी निघाले
तोडुन पाश सारे मुक्त होउनी निघाले

पंखात आज माझ्या गरुडाचे बळ आहे
नखांत आज माझ्या सिंहाची ताकद आहे
मुठीत बंद करण्या जगास मी निघाले
तोडुन पाश सारे मुक्त होउनी निघाले

No comments: