Saturday, June 30, 2007

वेडीवाकडी रेष जेव्हा कागदावर उतरते


वेडीवाकडी रेष जेव्हा कागदावर उतरते
अक्षरांची तेव्हा बरसात होते
अक्षरांच्या जुळण्याने शब्दरुप जन्म घेते
शब्दांची गुंफुन माळ एक ओळ अवतरते

कधी त्या ओळीला असतो आठवणींचा रंग
कधी त्यात मिळ्तो जीवनाचा तरंग

कधी ओळीला असतो ओल्या मातीचा सुगंध
कधी असतो तिला विरहाचाही गंध

कधी त्या ओळी गातात प्रितीची गाणी
कधी त्यातुन आठवतात जिवलग कोणी

कधी ओळींतुन झडतात भावनांचे मोती
कधी त्यांना जोडुन बनतात अपरिचित नाती गोती

मग कधी चढतो त्यांना सुरांचा साज
त्यांना दिला जातो गोड आवाज

मग मैफील जमते शब्द अन चालींची
शब्द मन व्यापतात तर ताल अंतकरण
बुडतो जीव आकंठ त्या मिलाफात
कर्ण त्रुप्त होतात त्या क्षणात

वाटते की ह्रुदयाच्या खोलातुन एक आवाज येत आहे
माझ्याही भावना शब्दरुप घेण्यास आसक्त आहे

No comments: