Sunday, November 18, 2007

आई

बीज अंकुरे अंकुरे,
मोल मायेचे फ़िटले,
बळ पंखांचे वाढले,
किमया आईची

देह चंदनापरि झिजला,
गुण त्याचाच उतरला,
लेप सोनियाचा ल्याला,
किमया आईची

जशी जळते ग वात,
देई अंधारास मात,
लख्ख जिवनी प्रभात,
किमया आईची

अश्रु दाटती नयनी,
ऐकुन माझी कहाणी,
दु:ख मागे ईश्वरचरणी,
वेडी माया आईची

उगा वेडी म्हणु नका,
माय माझी माझा सखा,
देव प्रत्यक्ष भेटला,
भक्त मी आईची

माय माझी वैशाखनिवारा,
माय माझी निस्वार्थी झरा,
फ़ैलावे चैतन्य पिसारा,
राहावे त्या खाली

सात जन्म ही ना फ़िटती,
ऋण ममतेचे किमती,
नाही बाजारी मिळती,
सावली आईची

स्पर्श मायेचा उबदार,
नयनी प्रेमाचा पाझर,
मिठी म्हणजे जिवनसार,
महानता आईची

--स्नेहा

Thursday, November 15, 2007

स्वप्नफ़ुले part II

स्वप्नफ़ुलान्च्या बागेत एक नवे स्वप्न फ़ुलले,
इवल्याश्या डोळ्यान्नी किलकिले पाहिले,
पाहुन स्वप्ननगरीस ते खुदकन हसले,
तुझे बोट पकडुन दुनियेत अवतरले...ज़प त्याला....

--स्नेहा

काळोखाच्या राज्यात चमके तो चान्द तारा,
रातराणीच्या गंधात धुन्द झाला गार वारा,
रात्रीच्या अंगणात स्वप्नफ़ुले फ़ुलवू जरा,
सुर्यकिरणान्च्या साथीने चढेल त्यास रंग न्यारा

--स्नेहा

आज स्वप्नपरी सवे दिसली एक गोड परी,
तेजोमय कान्ती अन नेत्रदिपक मुकुट शिरी,
तिचे एक स्मित उजळे लक्ष दिप धरेवरी,
स्वप्नफ़ुलान्ची लाडकी म्हणती तिज दिपावली

--स्नेहा

मी कोण ?

मी कोण ?

प्रत्येकाला हा प्रश्न कधी ना कधी पडतोच..
आज मला पण पडला..

मी तो सुर्य, तो चंद्र की ती पणती...

सुर्य म्हणजे स्वयंप्रकाशीत, स्वयंभु.....
ह्याच्या प्रकाशात सगळे उजळते..
हा झाकोळुन टाकतॊ सगळ्यांना..
ह्याच्याकडे उघड डोळ्यांनी पाहणे पण मुश्किल असते... नाही का?..
ना कोणी जवळ जाउ शकत...
त्याला सगळे नमन करतात ..पण त्याचा सखा होणे कोणासही शक्य नाही
त्याची संगत म्हणजे त्या झळा आणि एक झाकोळुन टाकणारे व्यक्तीमत्व..

मग कोण मी ?...तो चंद्र का...
तो शशी नेहमी सुर्याच्या प्रकाशावर अवलंबून
जरी वाटला शितल, शांत तरी...स्वयंप्रकाशासाठी परावलंबी...
हा देखील असे दूर गगनी ... त्या ता-यांना बिलगुनी...

का मी ती पणती...?
फ़क्त एकच ठिणगी..त्या पणतीला प्रज्वलित करायला पुरेशी..
त्या पणतीमधिल तेल म्हणजे ती धग..जी संपेपर्यंत पणती जगत असते..
जेव्हा मी जन्मले तेव्हाच ती पहिली ठिणगी मिळाली मला...
तेव्हा पासुन जळत आहे.....
आता ती धग संपेल तेव्हाच विझेन..
पण त्या दरम्यान खुप गोष्टी घडतील...
तो जोराचा वारा येउन विझवायचा यत्न करेल...
करु दे त्याला प्रयत्न .. हार मानणा-यातली मी नव्हे...
जरी लहान पणती ..तरी स्वयंप्रकाशित आहे..
उरी माझ्या प्रचंड तेज.. मी स्वावलंबी आहे...
अंधार दुर करण्याची शक्ती मी पण बाळगते..

मग मी नक्की ती पणती, ते तेल, ती वात , की ती ज्योत ...?
हम्म....कोणी ही नाही... मी फ़क्त तो प्रकाश
ती पणती, ते तेल, ती वात ,ती ज्योत ही फ़क्त जगाला अस्तित्व दाखवायची साधनं..
जसे हे शरीर ..नाही का ..?
मी त्या शरीरात वसणारी उर्जा .... त्या पणतीचा प्रकाश..
एक जोरदार वारा विझवेल ही कधी.... किंवा ते तेल संपेल..
मग मी नष्ट .....
जगातील प्रत्येक गोष्ट नष्ट होणारी आहे.....
मग का नष्ट होऊ नये थोडा उजेड देउन..

हो नक्किच मी ती पणती....

--स्नेहा

तुझी माझी URL एकच असावी

जेव्हा तुला पहातो तेव्हा
hang होते माझी hard Disk
माझी OS ही सांगते मला
घेतली आहेस मोठी Risk.

Risk Management क़ेलेय मी
Estimate ही काढला आहे.
थोडे Reengineering करावे लागेल
तुझा माझा समेट एवढा एकच पर्याय आहे.

फक्त एकदाच पहायचे आहे
तुझ्या ह्रुदयात Login करुन
Delete करायचेत सगळे Folder
फक्त माझ्या नावाचा Folder राखुन.

Antivirus बनेन तुझ्यासाठी
वाचवेन तुला Spam पासुन
एकच mail कर माझ्या mailवर
वाट बघतोय कधीपासुन.

म्हणणे फक्त एवढेच आहे
आशा करतो तुझी इच्छा ही असावी
कोणी visit द्यायचे म्हटले
तर तुझी माझी URL एकच असावी.......

नयी दोस्ती

नयी दोस्ती नयी बातें,
मुलाकातों की हसीं यादें,
तकदीर अच्छी जो मिले हम,
ना मिलते तो एक कमी रहती जैसे,

आपसा हसीं लाजवाब,
आपकी हंसी बेमिसाल,
उसपे आपका कोमल मन है कमाल,

रहना हमेशा ऐसे ही मासूम ,
होना कभी ना गुमसुम

--स्नेहा

दसरा

माधुर्याचे क्षण देउन जावो,
आनंदाचे उधाण घेउन येवो,
यशाशी सख्य असेच राहो,
सुखसम्रुद्धी जिवनात पेरुन जावो !
असा हा हसरा, आला सण दसरा..

--स्नेहा

दिवाली

महके जिवन जैसे उबटन,
रंगोली के साथ, नये रंगोंकी सौगात,
आपके जिवन आंगन मे जलता रहे खुशियों का दिया,
स्नेहा की तरफ़ से दिवाली की ढेरों बधाईया..

--स्नेहा

दिपावलीची रजनी

दिपावलीची रजनी,
सप्तरंगी तारे गगनी,
उजाळा दाटे मनी,
होऊन समाधानी,
घेतली पांघरुनी,
संत्रुप्त चादर जिवनी,
थकवा जाणवे तनी,
निद्रा येयी लोचनी.

--स्नेहा

ओवाळणी

भाऊबीजेच्या सकाळी,
दारी कढुनी रांगोळी,
बहिण भावाला ओवाळी,
हर्ष मनी

ओवाळणी भाऊ देयी,
हर जन्मी माझी सखी,
सदा राहो माया मनी,
हिच इच्छा

--स्नेहा

थैमान

घातले थैमान विचारांनी ,
अस्ताव्यस्त मनस्थिति,
अधु झाले मन,
त्याला सांभालू किती,

एकटी बरी मी,
एकटीच राहो,
जगापासून मन ,
अलिप्त राहो,
नको ती बंधने,
नको ते जाले,
जे जगले क्षण,
मनात गोंदवुन जाओ

--स्नेहा

Tuesday, November 6, 2007

जीवन म्हणजे स्वप्नांची पुर्तता

जीवन म्हणजे स्वप्नांची पुर्तता ...कधी लवकर कधी उशीरा,
ही स्वप्न छाप सोडुन जातात... कधी उथळ कधी गहिरा,
कदाचित जे मिळतं त्याच्या थोडं पुढचं दाखवतात...
अशा या स्वप्नांच्या बागेची कल्पना मी केली आहे,
या धाग्यात त्या बागेतील प्रत्येक स्वप्नफ़ुलाचे एकमेकांशी नातं सांगितलं आहे,
या जीवन धाग्यात, अशीच काही स्वप्नफ़ुले मी गुंफ़णार आहे,
त्यातली काही बहरतील, काही कोमेजतील,
पण त्या स्वप्नफ़ुलांच्या अस्तित्वाने हा जीवनधागा खुलला आहे,
इथे एक स्वप्नपरी ही आहे.... भेटायला आवडेल का तुम्हाला तिला?

स्वप्नफ़ुले

रात्रीच्या अंगणात स्वप्नफ़ुले फ़ुलली पहा
मंत्रमुग्ध गंध मधुर दरवळला पहा

ओढ घेते मन तिकडे जिथे भासे संगीत,
गुंजन ते करती रातकिडे निवांत पहा

काय अहा वर्णावी निर्जन ती वाट एकटी,
तो-यात चाले जणु नार नादवेडी पहा

स्वप्नफ़ुले हुन्गण्यास सरसावे मनवेडे,
नवचैतन्य फ़ुलवण्यास कासावीस पहा

हात हे रेन्गाळीती स्वप्नफ़ुले खुडण्यास,
दडवुन ठेवीते त्यांस सुगंध कुपीत पहा

--स्नेहा

स्वप्नपरी

आज एक स्वप्नफ़ुल स्वप्नातच तिज बोले,
तरल त्या पाकळ्यावर झुलवी तिज हिन्डोले,
जोराच एक झोका गगनी घेउनी गेला,
दिसे तिज स्रुष्टी सारी सजली तिज पाहाया,
अचंबित ती झाली समजेना काही तिला,
मज वरी ही स्रुष्टी फ़िदा असे मी काय केले?..

स्वप्नफ़ुल म्हणे तिला स्वप्नपरी अमुची तू,
विविधरंगी स्वप्नान्ची केलीस ही उधळण तू,
रोज नवे क्षितीज इथे ..
रोज नवा सुर्य इथे..
पाहिले तव चक्षुन्नी रोज एक चित्र नवे..
गायिले तव मुखाने रोज एक गीत नवे...

हर्शिली मग स्वप्नपरी हात तिने फ़ैलविले,
अम्रुताचे थेम्ब तीने स्वप्नफ़ुलान्वर उधळीले,
सुगंधीत फ़ुले झाली, मोहरले अंग अंग,
तसाच फ़ुलला जिवनधागा नवे नवे जिवन तरंग

--स्नेहा