सहजीवन
भांड्याला भांडं लागलं की आवाज हा होणारच. सहजीवन म्हणजे गुलाबाची फुले. हात लावताना काटे टोचणारच. पण कोणी त्या घमघमत्या ताटव्याला दूर करत नाही. आपलंसं करून त्या दरवळत्या सुवासाला लपेटुन घेतात...त्या दुखरर्या खुपर्या काट्यांसहीत...
या फुलांचा गुच्छ करुन कोणी सजविते देखिल या आयुष्याला फुलदाणी समजुन.. पण तसा तो दिखावाच ना..सरते शेवटी कोमेजणारच ते...
तेच त्या फुलांना न दुखवता.. त्या रोपट्यालाच फुलवलं तर....
आयुष्यभर या गुलाबांना आपण मुकणार नाही...
असंच असतं ना....
चहा गरम आहे...भाजलं तोंडाला..तर आपण फुंकर घालतोच ना....
हे वाळुचे घर आहे....मायेचा ओलावा तर हवाच...घर सांधायला..तोच हरवला तर ढासळेल सारं...

No comments:
Post a Comment