तन कोवळे फुलांचे कोमेजले उन्हाने
नाजूक त्या जीवाला असे जाळले उन्हाने
माझेच मैत्र माझ्या सवे फितूर झालेले
या सावलीस माझ्याच का जाळले उन्हाने
अजाणितेच घडले हे कसे अनाहूत
पावसांत देखील मज पोळले उन्हाने
शोधले कितीक वेळा माझ्याच अंतरंगी
माझ्याच अस्तित्वाला झाकोळले उन्हाने
हे असेच घडले गेली अनेक शतके
नारी स्वतंत्र झाली हे भासवले उन्हाने
-snehaa
3 comments:
I just came acroos your gracefull post and I found all the poems very touching. I give importance to the feelings expressed in a lucid manner. Wish you all the best as an elderly reader.
Mangesh Nabar
"या सावलीस माझ्याच का जाळले उन्हाने"
खरच वेदना मांडलीत आपण, फार छान
धन्यवाद...😊
Post a Comment