स्वार्थी या जगात मज माणसे भेटलेली
रेशमी कपडयात तलवार लपेटलेली
करती गनिम कावा तुझ्यावरीच धावा
जळतील हात दोन्ही ती आग पेटलेली
त्यांची मधूर वाणी भुलशील तू लगेच
लागेल ठेच तरीही असशील गुंगलेली
होतील खूप जखमा खोल अंतरंगात
ना रक्ताचा टिपूस तरीही बधिरलेली
ती फसवी वचने तेच कडवे बहाणे
स्वार्थास पुजणारी अशी जात गांजलेली
--snehaa
3 comments:
तुझ्या पोस्ट केलेल्या कविता पाहिल्या कम्युनिटिवर.. म्हणुन प्रोफाइल चेक केला तर तिथे ब्लॉग ची लिंक मिळाली. म्हणुन कॉमेंट टाकतोय.
मी पण ब्लॉगींग सुरु केलंय. पाडगांवकरांचा जरी ब्लॉग बंद केला तरीही माझा ब्लॉग सुरु आहेच.. भेट द्या.. लिंक माझ्या ऑर्कुट प्रोफाइलवर आहेच..
आणि अजुन एक सजेशन, तुझा ब्लॉग मराठी ब्लॉग विश्व वर रजिस्टर कर. म्हणजे ब्लॉग वर व्हिजिटर्स वाढतिल.
कांही मदत लागली तर अवश्य सांग.
एकच नंबर
Post a Comment