आगळ्या या नात्याला काय नाव द्यावं.
इथं थोडं तू घ्यावं नि थोडं मी द्यावं,
इथं थोडं तू द्यावं नी थोडं मी घ्यावं
चित्रामधे जसा दिसे निसर्गाचा भास,
चित्र-चित्रकार सारे भिन्न तरी रंगते साथ,
एकमेकांसवे रंगून ही थोडं अलिप्त राहावं
इथं थोडं तू घ्यावं नि थोडं मी द्यावं,
इथं थोडं तू द्यावं नी थोडं मी घ्यावं
शब्दांच्या तारेवरले दोन पक्षी आपण,
मनोमनीचे भाव दर्शवे बोलांचे हे दर्पण,
आयूष्याच्या या पटलावर नवं रूप दिसावं
इथं थोडं तू घ्यावं नि थोडं मी द्यावं,
इथं थोडं तू द्यावं नी थोडं मी घ्यावं
हृदयी माझ्या वसला तुझ्या शब्दांचा प्रवास,
पदोपदी सदा दरवळे प्रितीचा सूवास
न्हाऊनी या प्रितगंधी सदा त्रुप्त राहावं
इथं थोडं तू घ्यावं नि थोडं मी द्यावं,
इथं थोडं तू द्यावं नी थोडं मी घ्यावं
--स्नेहा
1 comment:
एकमेकांसवे रंगून ही थोडं अलिप्त राहावं
wah wah, sunder lihilas sneha....avadali kavita!
Post a Comment