प्रत्येकात लपलेलं असतं एक लहान मूल,
हृदयाच्या गाभा-यात दडलेलं असतं एक फूल.
काळाच्या वेगासवे फूल ते फूलत असतं,
हळूच त्या सुगंधासवे मनाला भूलवत असतं
आनंदाच्या क्षणी ते हळूच मिष्कील हास्य देतं
डोळ्यातल्या बाहूल्यात फूलतं अन भरभरून हसतं
दुखाच्या क्षणी मात्र खूप ओक्शीबोक्शी रडतं
आसवांच्या धारांसवे गालावरती ओघळून येतं
इथवर सगळं ठीक आहे सुरळीत सगळं चालू असतं
प्रश्न उभा राहतो जेव्हा...
दुस-याच्या हातातलं खेळणं हवं असतं
समजावून देखील अर्थ नसतो फ़ार,
सोसावे लागतात मनाचे सोपस्कार
चिमण्याशा गळ्याने ही ठणाठणा रडतं
मला ते हवेच आहे...असा हट्ट करतं
थकलेले आपण मग फ़ार नाही लढत
पुढचा विचार न ठेवता मान्य सारं करत
ओढून घेतॊ खेळणे आणि मूल हसू लागतं
या हसण्यात मात्र निरागस काहीच नसतं
--स्नेहा
No comments:
Post a Comment