Thursday, April 24, 2008

सपान

एका गावरान प्रेयसीला आपल्या प्रियकाराचा/ धन्याचा विरह सहन होत नाही आहे.
तो ती तिच्या भाषेत कसा व्यक्त करेल ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
कितपत यशस्वी आहे ते जाणकारच सांगू शकतील.
ती स्वत:ची स्थिती किती व्याकूळ आहे ते न सांगता म्हणते की तुम्ही ह्या तुळशीला पाणी द्यायला तरी परत या.
नक्की सांगा तुम्हाला हे सपान कसे वाटले.
******************************************************************
सपान...

रातीच्या गह-या पारी,
पापनीखाली लपतं,
सपान तुझं राया,
रोज भेटायाला येतं

माज्या डोळ्याचं पाकरू,
तुझ्या बागेमंदी गातं,
यादेच्या मागं मागं,
तुला शोधाया फ़िरतं

साधा भोळा माझा धनी,
तुजी भाबडीच माया,
सुख गवसलं मला,
तुज्या प्रेमळ छायंत

तुज्यासाटी जिव झुरं,
अन्न गोड बी लागंना,
दोन घास तुझं राया,
जिवाला थंडावतं

कधी येशील परत,
दारी तुळस वाढंना,
आंब्याचा झाडावर,
गोड कोकिळा गाईना

गावकोसावर उभा,
तुजा पारवा लाडका,
तुज्या वाटेवर टक,
जनू ध्यानाला तो उबा

शेतावरचा वारा ही,
तुज्या साठीच झूरतो,
येताजाता मला सदा,
तुजी उब देउन जातो

सांजच्या येळी धनी,
घर उदास वाटतं,
लयी तरसतं मन,
गोठ्यातल्य़ा आनंदाचं

यंदा येशीला का तुमी,
आमा सर्वाच्या भेटीला,
सुकलेल्या तुळसेला,
जरा जरा सांधायाला

--स्नेहा

3 comments:

अनामीक .. said...

just fantastic !! keep it up

HAREKRISHNAJI said...

beautiful, so sweet

दिपक said...

मस्त आहे..!:)ब्लॉग खुप आवडला.

एक सुचना करावीशी वाटली ब्लॉगच्या उजव्या बाजुला
असलेला साईड बार चा रंग जर बदलता आला तर बघा वाचताना त्रास होतो..