Wednesday, July 25, 2007

शेरो शायरी

जीने का बहाना ढुंढने जिंदगी गुजार रहे थे,
जब तुम चले गये, ये जाना के बहाना चला गया,
ाब जी रहे है के आपका दिदार हो जाये,
के तुम्हारा इंतजार ही जिनेका बहाना बन गया

--स्नेहा

जंजिरोंसे जखडे है मेरे हाथ ,
कैसे रोकु तुम्हे ए दिल,
चाहु भी तो पुकार ना पाऊं,
होंठ गये है मेरे सील

--स्नेहा

हजार नहिं एक लम्हा तो खुशिका,
हमारे साथ गुजार होगा,
जो याद करोगे तुम वो लम्हा,
तो जीवन सफल हमारा होगा

--स्नेहा

मौत भी ना मांगे हम रबसे,
यहि चाहत है अभी,
एक नजर तो देख पायेंगे आपको,
मौत के बाद वोह भी नही

--स्नेहा

जो सिनेमे धडकता है मेरे,
वोह दिल तो कब का तुम्हारा है,
हम तो हिफजत कर रहे है,
बस इंतजार तुम्हारा है

--स्नेहा

ना जाने क्युं एक दर्दसा होता है दिलमे,
जैसे की कोइ आग का दर्या है,
हम फिर रो लेते है आंसु बहाके,
के शायद ये आग बुझ जाये

--स्नेहा

यही तो मज़ा है ,ज़िंदगी खेल खेलती है
ढूँढा जहाँ में , आख़िर पैरों तलेही मिलती है.

..स्नेहा

Friday, July 20, 2007

सावळी मी

सावळे हे रुप माझे
सावळीच काया
सावलीही माझी
सावळीच आहे

सजवते आहे
सावळ्या तनुला
सावळ्या या गालावर
आज रक्तिमा आहे

सावळेच नभ सारे
जलधारा बरसता
त्सावळ्याच संध्याकाळी
सोबतीला असतात

सावळेच आहेत
द्रुष्टीतील दोन सखे
सावळ्या त्या सख्यांमुळे
दुनियेत रंग आहे

जगाच्या या सर्व छटा
सावळ्याच भासतात
भिजुन आज मी गेले
सावळ्या या रंगात

रंगावर जाऊ नका
मन निरंकार आहे
जरी सावळी मी
मन शुध्द माझे आहे

असे हे सावळे रुप माझे
सावळीच काया
सावलीही आज माझी
सावळीच आहे

हे मुंबईकर

ही मी निघाले माझ्या रस्त्यावर
रोजचीच वाट, रोजचेच धावणे
रोजचीच गर्दी, रोजचेच पाहुणे
माझ्यामागे त्यांचे रोजचेच धावणे

मुंबापुरी माझ्याबरोबर झोपते उठते
माझ्यासोबतच दिवस जगते
माझ्या प्रत्येक फेरीबरोबर
त्यांचे जीवन वेग धरते

झुकझुक माझ्या श्वासाबरोबर
त्यांचे जीवन ताल धरते
कधी संगीत तर कधी विसंगत
सुरावटीत ते ऐकु येते

प्रत्येक प्रवासी हितगुज करतो
सुखदुखांची रास उधळतो
माझ्यासोबत मनास मने
जुळवण्याचे तो प्रयत्न करतो

मी नेहमीच धावते
उनपावसाची कशास तमा
हेच मझे सांगणे तुम्हासी
जीवनगाणे गात रहा

(सगळे व्यवस्थित चालले होते...
पण नजर लागली कोणाची...?
तारीखः ११ जुलै २००५)

ते नरधम माझ्या जीवावर उठले
चढले ते शस्त्रास्त्रांनी स्फोटक सोडुन गेले
मोठ्या धमाक्याने तेव्हा माझे अंग चिरटले
आणि माझ्या साथिदारांच्या जिवाचे कत्तल केले

एक धमाका एक स्फोट
किती जिवांची कत्तल
तो आक्रोश ती धावपळ
जगण्याची ती धडपड

ती शरीराची लक्तरे,
ते लटकलेले हात,
ते रक्ताचे थारोळे,
निर्दयांनी केला घात

ती पिळवटलेली नजर,
विचारते 'मीच का?'
पाहणार्याच्या नजरेलाही
असह्य होतो धक्का

पहा पहा त्या बाळाचा आक्रोश
निर्जीव आईच्या कुशीत
सहज गेला नसेल जीव तिचा
त्याच्या भविष्याच्या विचारत

मग दिसतात सरसावलेले
तत्पर मदतीचे हात
घायाळांना दिलासा देणारे
ते देवाचे अवतार

वर्षे उलटली काळही सरला
मागे व्रणही ठेवुन गेला
निर्दयतेच्या क्रुर प्रसंगी
जीवनात घाव सोडुन गेला

खचले तेव्हा मी ,म्हणाले आता माझे कोणी नाही
मझ्याबरोबर राहुन जीव गमावेल कोणी

परंतु..

माझे नमन तुझ्या चरणी
हे मुंबईकर,
तुझ्या धाडसाला माझा सलाम,
ठेंगा दाखवुन दहशतवाद्यांना,
तु सुरु केलेस आपले काम

उदास जीवन



उदास होते माझे जीवन

कुठेच नव्हते आपलेपण

शोधत होती नजर कहितरी

वाटत होते यावे कुणीतरी


दिवसांमगुन दिवस जातसे

पहा पहा तो काळ जणु

भुतकाळाचे चित्र् फिरतसे

माझ्या डोळ्यापुढे जणु


आणि अचानक एके दिवशी

कुणास ठावुक कसे हे घडले

तुझे आगमन होता क्षणी मी

तुझीच होउन गेले


मन मोहरले फुलला वेल

त्याच्या सुगंधात मी न्हाले

तुझ्यासवे मग पार ही करण्या

संकटसागर तयार झाले


पण तु असे कसे केले

माझे मन तुझ्यापर्यंत नाही गेले

तु गेल्यावर उदास जीवन

पुन्हा परत आले