Friday, February 9, 2007

तु फक्त पुढ़े चालत जा

तु फक्त पुढ़े चालत जा
मग तु पहात राहा
जीवन होइल आनंदी
जगशील तु स्वच्छंदी

मागे वळून पाहु नकोस
ठेच लागली तरी थांबू नकोस
ज्याचे ध्यान लक्षावरती राही
त्याला कोण बरे अडवू पाही ?

जग असे कि आजच शेवट
वागू नको तु कधीही भेकट
आयुष्याचे पाहा सर्व रंग
प्रत्येक क्षणाचे नवे ढ़ंग

तु चलत राहा असा
चलतो एक वाटाड्या जसा
या वाटेवरुन चलत रह्शील
शेवटी तु अजरामर होशील

तु गेल्यावर तुझी आठवन लोकांसोबत राहावी
लाख नाही हजार नाही फक्त पाच माणसे तुझी असावी

कधी वाटते

कधी वाट्ते ऊन्च ऊडावे घ्यावी आकाशाला गवसणी

कधी वाट्ते आकाशातुन पडण्याची भीती


कधी वाट्ते गुलाबाच्या सुगन्धाला ठेवावे साठवूनी

कधी वाट्ते गुलाबाचे काटे टोचण्याची भीती


कधी वाट्ते विसरुन जाव्या भुतकाळाच्या गडद आठवणी

कधी वाट्ते भुतकाळात दडपण्याची भीती


कधी वाट्ते जीवन जगावे समुद्र्लाटेवर स्वार होऊनी

कधी वाटते लाटेबरोबर वाहुन जाण्याची भीती


कधी वाटते सभोवतालची सर्व माणसे विश्वासु

कधी वाटते सर्वांच्या मुखवट्याची भीती

सोनेरी क्षण आठवतात आपल्या सोबतीचे

माझ्या प्रत्येक हास्यावर तुझा फुलणारा चेहरा
माझ्या प्रत्येक दुखात सहभागी होणारा

किती वेडी होते मी तुझ्या प्रत्येक गोष्टीला भुलायचे
तुझ्या प्रत्येक शब्दाला माझ्या चेहर्यावर हसु फुलायचे

तुझ्या फक्त अस्तित्वाने हर्षवेडी व्हायचे मी
तुझ्या सोबतीतील हरेक क्षण मनाच्या कप्प्यात ठेवायचे मी

वाटायचे मजला प्रेम प्रेम ते हेच का आहे
तुझी माझी काया वेगळी पण ह्रुदय एकच आहे

नादान मी निघाले तुझ्या पावलावर पाऊल टाकुन
तुझ्यासाठी सगळी नातीगोती गेले विसरुन

मायाळु आईचा पदर सोडला आधारव्रूक्ष वडीलांचा परका झाला
एकटीला सोडुन गेलास काहीच का वाटले नाही तुला?

आयुष्याच्या या बिकट वळणावर
सोसाट्याच्या वार्याला घातला आहे मी आवर

छत्र उडाले माझे पण धीर सोडला नाही अजुन
तु गेलास पण सोबत माझा आत्मविश्वास आहे अजुन

हीच का जगरीत?




एक छोटेसे घरटे
दोन पिले दोघेजण
राहत होते घरट्यात
नव्हती काही अडचण

आजुबाजु होत्या घारी
त्यांचा घरट्यावर डोळा
संधीसाधु खेळ त्यांचा
करण्या घरट्याचा चोळामोळा

त्यांस सहन होइना
खेळीमेळीची राहाणी
त्यानी मग ठरविले
यांना द्यायच्या अडचणी

एके दिवशी अचानक
घारीने झडप घातली
छोटी पिलुराणी
त्यांनी तिथेच चटकली

असुर हा जागा झाला
झाला घरट्याचा नाश
त्याच्या समोरच झाला
कुटुंबाचा सर्वनाश

घार बोलली मोठ्याने
शुद्रा तुझी हीच गत
दुबळ्याचा जातो जीव
हीच का जगरीत?