मैत्रीच्या रेषा
Monday, December 8, 2008
हरवलेले हसू जिथे पुन्हा येते फुलून
सरत जाते मळभ अन आकाश निघते उजळून,
निसटलेल्या क्षणांचे पदर येतात जुळून,
मैत्रीमध्ये रमुन जावे सारे दु:ख विसरून
जिथे जुळत जाते सार्या विचारांची दिशा,
मनी दाटून येते फक्त मायेची भाषा,
धिरगंभीर वड-पारंब्या रुजतात खोल जशा,
आधार वृक्ष बनून येतात मैत्रीच्या रेषा
--स्नेहा



0 टिप्पणी: to “ मैत्रीच्या रेषा ”
Post a Comment