सोनकळी  

Saturday, August 23, 2008

निसर्गाचे वर्णन.....सोनकळी

ती पिंपळजाळी,
ती साधी भोळी,
ती अशी वेगळी,
सोनकळी

ती प्रभातवेळी,
लेऊन झळाळी,
सिंदूर कपाळी,
सोनकळी

तीज येता वेळी,
बोलावे भुपाळी,
कांतीस उजाळी,
सोनकळी

जशी चंद्रमौळी,
हळवी आगळी,
रुपात दुधाळी,
सोनकळी

जलमय निळी,
नादात तरळी,
जलापरी खेळी,
सोनकळी

-स्नेहा

AddThis Social Bookmark Button


0 टिप्पणी: to “ सोनकळी