Saturday, August 23, 2008

सोनकळी

निसर्गाचे वर्णन.....सोनकळी

ती पिंपळजाळी,
ती साधी भोळी,
ती अशी वेगळी,
सोनकळी

ती प्रभातवेळी,
लेऊन झळाळी,
सिंदूर कपाळी,
सोनकळी

तीज येता वेळी,
बोलावे भुपाळी,
कांतीस उजाळी,
सोनकळी

जशी चंद्रमौळी,
हळवी आगळी,
रुपात दुधाळी,
सोनकळी

जलमय निळी,
नादात तरळी,
जलापरी खेळी,
सोनकळी

-स्नेहा

Tuesday, August 12, 2008

आगळ्या या नात्याला काय नाव द्यावं.

आगळ्या या नात्याला काय नाव द्यावं.
इथं थोडं तू घ्यावं नि थोडं मी द्यावं,
इथं थोडं तू द्यावं नी थोडं मी घ्यावं

चित्रामधे जसा दिसे निसर्गाचा भास,
चित्र-चित्रकार सारे भिन्न तरी रंगते साथ,
एकमेकांसवे रंगून ही थोडं अलिप्त राहावं
इथं थोडं तू घ्यावं नि थोडं मी द्यावं,
इथं थोडं तू द्यावं नी थोडं मी घ्यावं

शब्दांच्या तारेवरले दोन पक्षी आपण,
मनोमनीचे भाव दर्शवे बोलांचे हे दर्पण,
आयूष्याच्या या पटलावर नवं रूप दिसावं
इथं थोडं तू घ्यावं नि थोडं मी द्यावं,
इथं थोडं तू द्यावं नी थोडं मी घ्यावं

हृदयी माझ्या वसला तुझ्या शब्दांचा प्रवास,
पदोपदी सदा दरवळे प्रितीचा सूवास
न्हाऊनी या प्रितगंधी सदा त्रुप्त राहावं
इथं थोडं तू घ्यावं नि थोडं मी द्यावं,
इथं थोडं तू द्यावं नी थोडं मी घ्यावं

--स्नेहा

उठ जराशी जाग जराशी

उठ जराशी जाग जराशी
आज मिळू दे आग जराशी
जिवनास सामोरे तू जा
त्यागून टाक सारी उदासी

मिळेल तुज हवे ते
गवसेल हरवले जे
फैलाव असे हात पुढे
झुकून तू जराशी

दु:खसावली येता दाटून
सुखी क्षणांना बघ आठवून
सरेल सारे मळभ नभीचे
सुरेल तान तू छेड जराशी

--स्नेहा

Saturday, August 9, 2008

आपका खिलता चेहरा

दिनभर की बातों से जब दिल भर आए,
हर पल गुज़ारते हुए खुद को तनहा पाए,
थकी हुई आँखें जब पलकें मूंदे ,
बस आपका ही खिलता चेहरा नज़र आए.

हर सुबह की ताझगी तुम,
हर दिन की सादगी तुम,
हर फूल की खुशबू तुम,
मेरी रूह मे हर जगह तुम,

तेरे होने से मेरी जिंदगी रौशन,
ना तुम तो वीरान दिल का गुलशन,
बस आपकी तस्वीर दिखाए दर्पण,
तेरे चरणोमे मेरा तन मन अर्पण

--स्नेहा

यादों के गलीयारोंसे जो गुजरे हम

यादों के गलीयारोंसे जो गुजरे हम,
मिली खट्टी खुशीयॉ और मीठे ग़म,
दो पल की जिंदगी और मिलों का सफ़र,
ये सोच खिला चेहरा और ऑखे नम|
यादों की हर गली अंजान सी लगे,
हर शक्स की ऑखों में पहचान सी लगे,
हर घर की चौखट पे मेरे नाम की दस्तक,
हर घर मे खुद ही मेहमान से लगे...|
--Sneha