Sunday, April 27, 2008

चांदण्याची चाहूल

खिडकीच्या झरोक्यातून चांदण्याची चाहूल,
चंद्राची कोर डोई रातराणी घाले भूल
तिच्या सुगंधाची ओढ करे वा-याला दिवाणा,
अन नाजूक पानांची ऐकू येते सळसळ

चांदणीच्या गाली खळी चांद नभात हासेल,
नभी नक्षत्रांचा सडा धरी उतरला भासेल,
मंद धूंद गार वारा शांततेच्या सानिध्यात,
सारून काळोखाला चंद्रप्रकाश दाटेल

अशा शितल समयी असे मिलन घडेल,
चंद्र चांदणीची साक्ष ख-या प्रेमाला मिळेल,
चमकती चम चम तारे प्रफ़ुल्लित जग होई,
जेव्हा सुखाच्या वाटेवर शुभ्र चांदणे पसरेल

--स्नेहा

2 comments:

मोरपीस said...

आपण फ़ार छान कवयित्री आहात आणि शब्दांशी खेळण्याची जादू आपल्याकडे आहे असेच म्हणावे लागेल.

Abhijit Galgalikar said...

वाह .. तुझ्या नविन कविता वाचून छान वाटले .. लिहित रहा अशीच .. :) .. आणि तुम्ही गायब त्या गायबच हो .. आम्हा गरीबांची आठवण ठेवावी जरा .. ;) ..