असावी तुला आस माझ्या संगतीची
अशी वेडी आशाच माझ्या मनीचीकळावी तुला चाल माझ्या लयी ची
कधी होईन का मी तुझ्या सरीची
भिजू दे मला तुझिया प्रीतीत
निजू दे मला तुझिया मिठीत
अजुनी काय मी अपेक्षावे
तू आणि मी एकरूप असावे
कुठूनी असा हा आला दुरावा
सुकुनी च गेला हृदयाचा ओलावा
काय झाले असे मला नाही ठावे
कुठे तू हरवला अन मी झुरावे
एकच गोष्ट तू फक्त कर आता
हृदयावर माझ्या नको वार आता
सांगून टाक मला माझी औकात काय
सांगून टाक तुला माझी गरजच नाय
गप्प बसून घेईन मी ऐकून सगळं
एकच असेल समाधान की कळलं सगळं
अपेक्षांच्या ओझ्याखाली तू दबणार नाही
घुसमट तुझी थांबेल बाकी काही नाही
दोन शब्द मोकळे बोल असतील जरी कडू
दोन अश्रू वाहतील येईल पण रडू
पण होतील दोन मने खूप खूप मोकळी
तुटेल ना रे ती अपेक्षांची साखळी
ओझे झाले आहे फक्त सांग एवढे
उत्तर ऐकायला नको आढे वेडे
खरंच मला ऐकायचे माझं स्थान काय
पायदळी दिलेस तरी मला त्रास नाय
एकच समाधान की खरी किमंत कळेल
मी कोण आहे तुझ्यासाठी याचं उत्तर मिळेल
मग मी करेन नक्की माझी अपेक्षा काबू
नाही करणार मी या गोष्टीचा टाबु
नसेन मी आवडत तरी एकदा घेशील का कवेत
विरून गेलेत सगळे इमले चटकन हवेत
कधीतरी होतो आपण एकमकांसवे
कुठे काय चुकले मला काहीच नाही ठावे
माझ्या दोन अश्रूंची थोडी किंमत कर
एकदा माझा हात हातात धर
स्पर्श तुझा हातामध्ये साठवून घेईन
तोच स्पर्श परत परत आठवत राहीन
खरं खरं सांगशील का अबोल्याच कारण
आता सहन होत नाही यावं वाटतं मरण
जगण्याची इच्छा आता राहिलीच नाही शिल्लक
कारण ऐकून संपवून टाकीन जीवन हे शुल्लक
माहीत आहे मला तु मोकळा श्वास घेशील
मी गेल्यावर माझ्यावर सगळे दोष देशील
कित्ती clueless वाटत आहे मला हे सगळं
वाटतं लवकर संपवावं आज मी हे सगळं
- स्नेहा